मुंबईच्या यादीतून 36 लाख मतदार वगळले, चांदिवलीत सर्वाधिक 1.91 लाख नावे बाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशेष मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेनंतर निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये राज्यातील 2 कोटी 7 लाख मतदारांना वगळण्यात आले आहे. त्यांचा नावाचा समावेश यादीमध्ये नाही. यात मुंबईतील 36 लाखांपेक्षा जास्त मतदारांचा समावेश आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक 1 लाख 91 हजार मतदार वगळले गेले आहेत.

प्रारूप मतदार यादीतील जिल्हानिहाय व मतदारसंघनिहाय आकडेवारी निवडणूक आयोगाने आज दिली. त्यात मुंबई शहर आणि उपनगर जिह्यातील 36 लाख 8 हजार 922 मतदार वगळण्यात आले आहेत. मुंबई शहरातील 9 लाख 50 हजार 720 तर मुंबई उपनगरातील 26 लाख 58 हजार 202 मतदारांचा त्यात समावेश आहे. मतदार यादीमध्ये दुबार नावे असणे, मृत, कायमचे स्थलांतरीत, गैरहजर आणि अन्य कारणास्तव या मतदारांची नावेच यादीतून वजा करण्यात आली आहेत.

वगळलेल्या मतदारांची संख्या

दुबार मतदार ः 1 लाख 39 हजार 847

मृत मतदार ः 4 लाख 80 हजार 370

स्थलांतरीत ः 17 लाख 60 हजार 210

गैरहजर ः 11 लाख 45 हजार 313

इतर कारणे ः 83 हजार 182

येथे लाखांवर मतदार गायब

चांदिवली (1,91,577), वरळी (1,05,575), दिंडोशी (1,12,792), चारकोप (1,06,787), मालाड प. (1,41,584), गोरेगाव (1,22,834), वर्सोवा (1,13,890), अंधेरी प. (1,05,936), मानखुर्द शिवाजीनगर (1,46,912), कुर्ला (1,06,829), वांद्रे प. (1,10,544), मलबार हिल (1,02,049), कुलाबा (1,19,606)