
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा होणार असल्याची पूर्वकल्पना असतानाही बैठकीला दांडी मारून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना शिंदे ठाण्यातील निवास्थानी होते. यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, संघटनात्मक कामासाठी दिल्लीत आल्याचे शिंदे यांनी दिल्लीत स्पष्ट केले.

























































