निवृत्त शिक्षकाला 33 लाखांचा गंडा, डिजिटल अरेस्टची भीती दाखवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार हा आता केवळ शहरापुरता मर्यादीत राहिला नाही. तो खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला आहे. यवतमाळ शहरात एका निवृत्त शिक्षकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून चार दिवसात 32 लाख 80 हजार 200 रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

79 वर्षे वयाच्या सेवानिवृत्त शिक्षकाला अज्ञात नंबरवरून रात्री साडेआठच्या सुमारास कॉल आला. राजेशकुमार यादव नाव सांगत डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगितले. मनी लॉण्डरिंग प्रकरणात तुमचे नाव आले आहे. कोणत्याही क्षणी तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी होऊ शकते, अशी धमकी देण्यात आली.  बोगस अधिकाऱयांवर विश्वास ठेवून या शिक्षकाने पत्नी व स्वतःच्या नावे असलेल्या 12 एफडी मोडल्या. त्यातून 21 लाख 80 हजार 200 बँक ऑफ इंडिया बंगळुरूच्या खात्यात जमा केले.