शिवसेनेकडून बोरिवलीत ‘स्किल ब्रिज’ प्रशिक्षण केंद्र सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना व महायूथ फाउंडेशनच्या वतीने बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्किल ब्रिज’ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंटचे कौशल्याधारित प्रशिक्षण, पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणाची संधी तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिवसेना मागाठाणे विधानसभा संघटक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य मिलिंद साटम यांच्या प्रयत्नांतून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या पेंद्रात महायूथ फाउंडेशनचे संचालक राहुल बेलवलकर, दयाल कांगणे आणि तुषार शेट्टी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आज मुंबई पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते या पेंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख उदेश पाटेकर, राज्य समन्वयक उद्धव कदम, विभाग संघटक शुभदा शिंदे, नगरसेवक धरम काळे, विनायक सामंत, अशोक म्हमुनकर, सचिन मोरे, विपुल दारूवाले, विठ्ठल नलावडे, दादा पानमंद, राजू नवरत, रामकृष्ण कदम, चित्तरंजन देवकर, सुजाता पाटेकर, रेखा बोराडे, रोशनी कोरे- गायकवाड, दीपा चुरी, सुविधा गवस, पह्रम परमार, छाया आमरुळे, धनश्री चव्हाण, हेमा मयेकर, दीपाली आवरी, युगा राऊत, कमल चिलवे, नंदा वंजारे, स्नेहा कोटकर, प्रियांक राऊत, मंडळाचे विश्वस्त व माजी नगरसेवक संजीव बावडेकर, संजीव मोंडकर आदी उपस्थित होते.