
कांद्याचे दर वाढू लागले आहेत. कांद्यांचे भाव 60 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. कांद्याच्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने 17 शहरांत 4000 टन कांदा विक्रीसाठी आणला आहे. ग्राहकांना 35 रुपये दराने या कांद्याची विक्री केली जात आहे. वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारने ग्राहकांना दिलासा दिला आहे.
कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकमधून सवलतीच्या दरात कांद्याची विक्री सुरू केली आहे. केंद्र सरकारने 2026 या वर्षासाठी अंदाजे 1.21 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक तयार केला आहे. सरकारने आतापर्यंत 17 शहरांमध्ये अंदाजे 4000 टन बफर स्टॉक विकला आहे.


























































