ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये माँसाहेबांना अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाशी येथील शिवसेना शाखेत माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांनी त्यांना वंदन केले. यावेळी बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, विधानसभाप्रमुख अतुल कुलकर्णी, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत मढवी, महेश कोटीवाले, शहरप्रमुख विशाल ससाणे आदी उपस्थित होते.

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी ठाण्यातील त्यांच्या अर्धपुतळ्याला शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, विभागप्रमुख मयूर पैलकर, उपविभागप्रमुख सत्यवान कदम, विभाग संघटक योगेश भोईर, शाखाप्रमुख किशोर सुर्वे, सागर माने, मनोज पाटील, महिला विभाग संघटक वैशाली मोरे, शाखा संघटक जया बानगुडे, उपविभाग संघटक मयूरी कदम, राजश्री सुर्वे, संपदा उरणकर, कविता नार्वेकर, ज्योती कोळी, नंदा कोथळे, विभाग संघटक रसिका सुबेदार, कांता पाटील, ठाणे विधानसभा संघटक प्रमिला भांगे, कल्पना कदम, स्मिता सकपाळ, भारती उरणकर, राजू महाडिक, राजू मोरे, मंदार घोरपडे आदी उपस्थित होते.

शिवसेना उरण शाखेत अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, माजी उपनगराध्यक्ष गणेश शिंदे, शिवसेना अल्पसंख्याक सेलचे जिल्हा संघटक असाद अखवारे, जिल्हा सरचिटणीस अन्वर कुरेशी, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, परमानंद करगुटकर, उपशहरप्रमुख कैलास पाटील, फतेह खान, पुष्पा लवे, मुमताज भाटकर, रुबिना कुट्टी, सायरा खान, रुकसाना सय्यद, नंदू पाटील, विनोद कोठारी, गुलजार भाटकर उपस्थित होते.

शिवसेना पनवेल शहर शाखेच्या वतीने माँसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विभागप्रमुख प्रवीण जाधव, शहर संघटक उज्ज्वला गावडे, प्रभागप्रमुख प्रशांत नरसाळे, ग्राहक कक्षाचे कुणाल कुरघोडे, शाखाप्रमुख संतोष तळेकर, मयूरेश पाटील, विभाग संघटक अश्विनी देसाई, अरुण ठाकूर, राम मंजुळे आणि अतुल टेमघरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.