
‘मिर्झापूर द मुव्ही’ या चित्रपटासाठी रविवारी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून आली. मिर्झापूरने रविवारी बॉक्स ऑफिसवर चांगलीच बाजी मारली. दमदार सुरुवातीनंतर, ‘मिर्झापूर द मुव्ही’ने आपल्या ओपनिंग वीकेंडमध्येही धुमाकूळ घातला. चित्रपटाने ₹25.75 कोटींची कमाई करून सुरुवात केली आणि दुसऱ्या शनिवारी, कमाईत मोठ्या पटीने वाढ नोंदवत ₹32 कोटी कमावले. आता, सॅकनिल्कच्या (SacNilk) अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मिर्झापूर द मुव्ही’ने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी, रविवारी, ₹36 कोटींची कमाई केली आहे. यामुळे, चित्रपटाची हिंदुस्थानातील तीन दिवसांची निव्वळ कमाई आता ₹93.75 कोटींवर पोहोचली आहे.
यशच्या ‘टॉक्सिक’ने चित्रपटगृहांमध्ये आपल्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. त्याने पहिल्या आठवड्यात 239.30 कोटी रुपये कमावले. यानंतर, दुसऱ्या शुक्रवारी त्याची कमाई 1.75 कोटी रुपये होती. दुसऱ्या शनिवारी त्याने पुन्हा उसळी घेतली आणि 2.28 कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या (SacNilc) सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘टॉक्सिक’ने प्रदर्शनाच्या 12 व्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या रविवारी, 2.42 कोटी रुपये कमावले. यामुळे, चित्रपटाची हिंदुस्थानातील 12 दिवसांची कमाई आता 245.75 कोटी रुपये झाली आहे.
नीम करोली बाबांवर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालत आहे. या चित्रपटाला पहिल्या दोन आठवड्यांत कमाईसाठी संघर्ष करावा लागला असला तरी, चौथ्या आठवड्यात त्याने प्रचंड उसळी घेतली आणि नवीन चित्रपटांच्या गर्दीत पाचव्या वीकेंडला बाजी मारली. सॅकनिल्कच्या (SacNilk) सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘हनुमान अंश’ने प्रदर्शनाच्या 31 व्या दिवशी, म्हणजेच पाचव्या रविवारी, ₹22.75 कोटींची कमाई केली. यामुळे, चित्रपटाची हिंदुस्थानातील 31 दिवसांची कमाई आता ₹122.13 कोटींवर पोहोचली आहे.


























































