
बँक ऑफ बडोदाने 1100 पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. बँकेत नोकरी मिळवण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. बँक ऑफ बडोदाकडून वेल्थ एक्झिक्युटिव्ह आणि क्रेडिट अनालिस्ट या दोन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.
या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया 4 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी, 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदासाठी, उमेदवारांचे वय 22 ते 32 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
क्रेडिट अॅनालिस्ट पदासाठी, वयोमर्यादा 21 ते 33 वर्षे आहे. वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 रुपये ते 85,920 रुपये इतके मूळ वेतन मिळेल. क्रेडिट अॅनालिस्ट पदासाठी, त्यांना 64,820 रुपये ते 93,960 रुपये इतकी मूळ वेतनश्रेणी मिळेल. बँकेच्या नियमांनुसार इतर भत्तेदेखील उपलब्ध असतील.
























































