असं झालं तर… जमीन खरेदी करणाऱ्याने दिलेला चेक बाऊन्स झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरेदी खत झाल्यानंतर जर रकमेचा चेक बाऊन्स झाला/पैसे मिळाले नाहीत, तर खरेदी खत आपोआप रद्द होत नाही, न्यायालयात कायदेशीर दावा दाखल करावा लागतो.

प्रथम निगोशिएबल इंस्टमेंट ऍक्टखाली चेक न वटल्याचा व फसवणूक करून खरेदी खत झाल्याचा दिवाणी दावा करताना कोर्टाच्या मार्फत खरेदी खत रद्द केल्याचा आदेश घेणे.

बँकेकडून रिटर्न मेमो आणि त्याचे कारण दाखवणार पत्र घ्या. मेमो मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत संबंधित दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार करू शकता.

याशिवाय, निगोशिएबल इन्स्टमेंट्स ऍक्टच्या (N.I. Act) कलम 138 नुसार चेक बाऊन्स झाल्याबद्दल स्वतंत्र फौजदारी कारवाई देखील करता येते.

आपण दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन – खरेदीदाराच्या सहमतीने खरेदी खत रद्द करू शकता. सर्व गोष्टींसाठी वकिलांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.