
चार वर्षांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. युद्धामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यावर उपाय म्हणून युक्रेनमध्ये तेथील पॉर्न उद्योगाला कायदेशीर दर्जा देण्याचा विचार सुरू आहे. युद्धासाठी निधी उभारण्यासाठी अश्लील व्हिडीओवर कर आकारण्यासंदर्भात युक्रेनमधील झेलेन्स्की सरकार नवे विधेयक आणणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास 2.5 कोटी डॉलर एवढी रक्कम कर स्वरूपात दरवर्षी मिळेल.
























































