
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील वाढता गैरप्रकार, पेपरफुटीविरोधात पुणे, कोल्हापूरपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी उठाव केला.

एमपीएससीच्या संपूर्ण कारभारात पारदर्शकतेची मागणी करत विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला.

मंगळवारी सकाळी शहरातील क्रांती चौकात जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबरोबरच आयोगाचा कारभार सुधारण्याची मागणी केली.
पुणे, कोल्हापूर पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; क्रांती चौकात जमले शेकडो विद्यार्थी, MPSC परीक्षेच्या कारभारात पारदर्शकता आणि पेपरफुटी प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी pic.twitter.com/7XBpvkFPEQ
— Saamana Online (@SaamanaOnline) September 8, 2026
यावेळी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर झळकावले. ‘आम्ही रात्रंदिवस झिझायचं, तुम्ही पेपर फोडून विकायचं’… ‘एमपीएससी मेहनत? की पैशांचा खेळ?’, अशी वाक्य लक्ष वेधून घेत होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या आक्रोश मोर्चाचे फोटो समाजमाध्यमावर शेअर केले आहेत. काल पुण्यात दिसली तशीच MPSC च्या विद्यार्थ्यांची एकजूट आज छत्रपती संभाजीनगरमध्येही दिसत असून विद्यार्थ्यांच्या या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आतातरी सरकारने MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावं आणि पेपरफुटीप्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करावी. अन्यथा आज दिसत असलेला विद्यार्थ्यांचा आक्रोश हळूहळू रोषात रुपांतरीत होईल आणि ते सरकारला परवडणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
काल पुण्यात दिसली तशीच MPSC च्या विद्यार्थ्यांची एकजूट आज छत्रपती संभाजीनगरमध्येही दिसत असून विद्यार्थ्यांच्या या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आतातरी सरकारने MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावं आणि पेपरफुटीप्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या सर्व… pic.twitter.com/xYrLaln9wC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 8, 2026

























































