इंजिन निकामी झाल्याने अलायन्स एअरच्या विमानाचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंजिन निकामी झाल्याने अलायन्स एअरच्या विमानाचे शुक्रवारी दुपारी दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान सुरक्षित उतरल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

अलायन्स एअरचे ATR 72-600 हे विमान प्रयागराजहून दिल्लीला चालले होते. विमानात 40 प्रवासी आणि 4 कर्मचारी होते. दिल्लीकडे येत असताना विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनमधील तेलाचा दाब कमी झाल्यामुळे मुख्य वैमानिकाने प्राधान्याने लँडिंग करण्याची विनंती केली. यानंतर दिल्ली विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.