
गणेशोत्सवानिमित्त पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोज दरम्यान विशेष शुल्कासह एक विशेष गाडी चालवणार आहे. ही गाडी दोन्ही दिशांनी बोरीवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावरडा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप स्थानकांवर थांबेल.
गाडी क्र. 09019 मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड विशेष गाडी मुंबई सेंट्रल येथून शुक्रवारी, 25 सप्टेंबर 2026 आणि शनिवारी, 26 सप्टेंबर 2026 रोजी 10.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 02.30 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. तसेच, गाडी क्र. 09020 सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून शनिवारी, 26 सप्टेंबर 2026 आणि रविवारी, 27 सप्टेंबर 2026 रोजी 04.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. गाडी क्र. 09019 चे आरक्षण 12 सप्टेंबर 2026 पासून सर्व पीआरएस खिडक्यांवर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.



























































