रखडलेले प्रकल्प तत्काळ मार्गी लावा; संजय राऊत, अंबादास दानवेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे शिष्टमंडळ नांदेड जिल्हाधिकार्‍यांना भेटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमसे ना हो पायेगा या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या धरणे आंदोलनानंतर शिवसेनेचे खासदार शिवसेना नेते संजय राऊत व शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून रखडलेले प्रकल्प तात्काळ मार्गी लावा, अशी मागणी केली.

शिवसेनेच्या आजच्या आंदोलनानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकार्‍यांना भेटले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी केले. यावेळी मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पाबाबत, मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणाबाबत कुठलीही अंमलबजावणी झाली नाही, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली, किमान सिंचन प्रकल्प, मुक्तीसंग्रामाच्या संदर्भात असलेल्या वास्तूसंग्रहालयाचा प्रकल्प, कल्हाळी येथील स्मारकाचा प्रकल्प का रखडला, असा सवाल यावेळी दानवे यांनी केला. विज वितरण कंपनीने ऐन दुष्काळात ग्रामीण भागात केवळ दोन तास वीज पुरवठा सुरु ठेवला आहे. यामुळे बळीराजा अगोदरच संकटात असताना त्यात हे नविन संकट निर्माण झाले असून, हा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली. लेंडी प्रकल्पाचा प्रश्न रखडत पडला असून, परिसरातील बारा गावांच्या पुनर्वसनाचे काय झाले, असा सवालही दानवे यांनी केला. सर्व संबंधित अधिकार्‍यांना आजच्या बैठकीला मी येण्याची विनंती केली होती, फक्त वीज वितरण कंपनीचे अधिकारी आले याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. रखडलेले प्रकल्प मार्गी लावून मराठवाड्याला न्याय द्या, मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.

यावेळी शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार राहुल पाटील, आमदार प्रविण स्वामी, नांदेड लोकसभा संपर्कप्रमुख किशोर पोतदार, जिल्हाप्रमुख बबन बारसे, भुजंग पाटील, ज्योतिबा खराटे, सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी, युवासेनेचे विभागीय सचिव महेश खेडकर, माजी आमदार अनुसया खेडकर, महिला आघाडीच्या वत्सलाताई पुयड, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम, दक्षिण महानगरप्रमुख मनोज यादव, पुरुषोत्तम धोंडगे, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, गणेश गिरी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी या मागण्यांचा पाठपुरावा आपण शासनस्तरावर करु, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.