
दुखापतीच्या सावटाखाली असलेल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. मात्र वेगवान गोलंदाज हर्षित राणाला नव्या दुखापतीमुळे मालिकेसह आशियाई क्रीडा स्पर्धेतील संघातूनही बाहेर पडावे लागले आहे. त्याच्या जागी यश ठापूरला लॉटरी लागली आहे.
बुमरा, नितीशपुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा सुरुवातीच्या संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्यांना तंदुरुस्तीची मंजुरी मिळणे आवश्यक होते. तिघांनाही तंदुरुस्त घोषित करण्यात आले असून 13 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ सज्ज झाला आहे.
बुमराच्या डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याने तो जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकला नव्हता. इंग्लंड दौऱ्यात हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना मांडीच्या मागील स्नायूंच्या दुखापती झाल्या होत्या, तर नितीशपुमार रेड्डीला जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मांडीच्या पुढील स्नायूला दुखापत झाली होती.
पुनर्वसनातच हर्षितला नवी दुखापत
हर्षित राणा पुनर्वसनातून चांगली प्रगती करत होता. मात्र 7 सप्टेंबरला बंगळुरू येथील बीसीसीआयच्या उत्पृष्टता पेंद्रात सराव सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना त्याच्या मांडीच्या पुढील स्नायूला ताण आला. त्यामुळे त्याला संघातून बाहेर पडावे लागले, अशी माहिती बीसीसीआयने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली. हर्षितच्या जागी निवड झालेला 27 वर्षीय यश ठापूरने जुलैमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने दोन सामन्यांत प्रत्येकी दोन विकेट घेतल्या होत्या. नुकत्याच झालेल्या दुलीप करंडकाच्या उपांत्य फेरीत मध्य विभागाकडून खेळताना त्याने पहिल्या डावात तीन, तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली.

























































