
दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माने यावेळी गोलंदाजीला पराभवासाठी दोषी ठरवले आहे. तिलक म्हणाला, ‘खरं सांगायचं तर आमच्यासाठी हे निराशाजनक आहे, पण आम्ही या सामन्यातून खूप काही शिकलो आहोत. आम्ही अधिक मजबूत होऊन परत येऊ अशी आशा आहे. आम्ही पहिल्या दिवशी अधिक चांगली गोलंदाजी करू शकलो असतो, पण जेव्हा त्यांनी 700 धावा फलकावर लावल्या तेव्हा त्यांनी तिथेच सामना जिंकला. 700 धावांचा पाठलाग करणे सोपे नसते, पण त्यांच्या फलंदाजांना श्रेय द्यायला हवं. आम्हीसुद्धा चांगली गोलंदाजी केली नाही, हेदेखील खरे आहे.’
तिलक पुढे म्हणाला, ‘708 धावांचा पाठलाग करताना पुढील तीन दिवस फलंदाजी करत राहण्याचा आमचा विचार होता. आम्ही आमचा सर्वोत्तम प्रयत्न केला. जर आम्ही तीन दिवस खेळलो असतो तर आम्ही 700 धावा केल्या असत्या किंवा सामना अनिर्णित राहिला असता. पण पूर्व विभागाला श्रेय द्यायला हवं त्यांनी आम्हाला पूर्णपणे निष्प्रभ केले.’
























































