ठाणे महानगर अॅथलेटिक्स योजनेची आठ सुवर्णपदकांना गवसणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे महानगर अॅथलेटिक्स योजनेने तब्बल आठ सुवर्णपदाकांची कमाई केली. ही स्पर्धा चिपळूणमधील डेरवण येथे नुकतीच पार पडली होती. या स्पर्धेत काव्या कानगाळे, रिसा फर्नांडिस, श्रेष्ठा शेट्टी, अनिरुद्ध नंबुद्री, धैर्य सूर्यराव, मानस शिंदे यांनी सुवर्णपदके पटकावली.  सुवर्णपदक पटकावल्यावर काव्या म्हणाली, ‘हे माझे राज्यस्तरीय स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. मी कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी मी कठोर परिश्रम करेन.’

पदकविजेत्यांची नावे पुढील प्रमाणे

14 वर्षांखालील मुली – काव्या कानगाळे – सुवर्ण पदक – ट्रायथलॉन ‘अ’.

16 वर्षांखालील मुली – रिसा फर्नांडिस – सुवर्ण पदक – लांब उडी आणि रौप्य पदक – मेडली रिले.

18 वर्षांखालील मुली – मिहिका सुर्वे – रौप्य पदक – 400 मीटर धावणे.

20 वर्षांखालील मुली – श्रेष्ठा शेट्टी – लांब उडी – सुवर्ण पदक.

16 वर्षांखालील मुले – अनिरुद्ध नंबुद्री – 600 मीटर धावणे आणि मेडली रिले – सुवर्ण पदक. धैर्य सूर्यराव – 60 मीटर धावणे – रौप्य पदक आणि मेडली रिले – सुवर्ण पदक.

18 वर्षांखालील मुले – मानस शिंदे – 200 मीटर आणि 400 मीटर धावणे – सुवर्ण पदक.