मागाठाण्यात मंगळागौरीच्या पारंपरिक खेळाचा उत्साह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या वतीने मागाठाणे, बोरिवली पूर्व येथे आयोजित श्रावणी महोत्सव मोठय़ा उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक साडी, हिरवा चुडा, मेहंदीचा साज आणि मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी संपूर्ण वातावरणाला मराठमोळा रंग चढला. संगीतखुर्ची, नृत्य आणि विविध खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

शिवसेना नगरसेविका सारिका झोरे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपल्या संस्कृतीची ही समृद्ध परंपरा जपण्यासोबतच महिलांना आनंदाचे आणि आपलेपणाचे व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील हेतू होता. यावेळी सायली प्रभू, जयश्री पोतनीस, सुजाता पाटेकर, पूजा घोसाळकर, माधुरी भोईर, नलिनी देसाई, शलाका कदम, भारती कदम, रोहिणी चौगुले, सोनाली विचारे, उषा कोरगावकर, अमिता सावंत, संकला ढोलम, माधुरी खानविलकर, वनिता दळवी, आशा केणी, इतिश्री महाडिक यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास मागाठाणे विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, नगरसेवक धर्मेंद्र काळे, उपविभागप्रमुख योगेश भोईर, तुकाराम पालव, सचिन मोरे, योगेश देसाई, विठ्ठल नलावडे, नितीन नाईक, संजय ढोलम, हनुमंत मोरे यांनी सहकार्य केले.