
कोको गॉफने अटीतटीच्या लढतीत मीरा आंद्रेव्हाचा पराभव केला. उपांत्य फेरीत तिचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या एलेना रायबाकिनाविरुद्ध होणार आहे. पुरुषांच्या एकेरीत ज्वेरेव्हने विजयाची मालिका कायम ठेवत उपांत्य फेरी गाठली आहे. गॉफने 2-6, 7-6 (9-7), 6-2 असा विजय मिळवला. महिलांच्या अजून एका सामन्यात एलेना रायबाकिनाने झेंग किनवेनवर पहिला सेट गमावूनही विजय साकारला. रायबाकिनाला पहिला सेट 3-6 असा गमवावा लागला होता. पण त्यानंतर तिने सामन्यात झोकात पुनरागमन करत दुसरा सेट 6-1 असा सहजपणे जिंकला. त्यानंतर तिसरा सेट 6-4 असा जिंकत तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या एकेरीमध्ये अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने बोटिक व्हॅन डी झँडशल्पचा 6-2, 7-5, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
























































