
पूर्व चीनमधील छिंगदाओ शहरातील एका गोदीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या परदेशी ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाला आग लागली. यात किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण बेपत्ता आहेत. शानदोंग प्रांतातील छिंगदाओ येथील बेहाई शिपबिल्डिंग कंपनीच्या गोदीत गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.15 च्या सुमारास ही आग लागली. या घटनेनंतर चिनी अधिकाऱ्यांनी तात्काळ शोध आणि बचाव कार्य सुरू केले.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शानदोंग प्रांतातील छिंगदाओ येथील बेहाई शिपबिल्डिंग कंपनी लिमिटेडच्या मालकीचे एक परदेशी मालवाहू जहाज देखभालीसाठी बंदरात नांगरून ठेवले होते. या जहाजाला आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

























































