
राष्ट्रीय युवा अॅथलेटिक्स स्पर्धा ही पंजाबमधील लुधियाना येथील गुरु नानक स्टेडियमवर 1 ते 3 सप्टेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मानस शिंदेने 200 मीटर शर्यतीत 21.51 सेकंदांची वेळ नोंदवत स्पर्धेतील नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याने 21.65 सेकंदांचा जुना विक्रम मोडीत काढला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मानसने 400 मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले.
मानस म्हणाला, ‘ही माझी दुसरी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे. पदकापर्यंत मजल मारल्याचा मला आनंद आहेच, पण त्याहून अधिक समाधान या गोष्टीचे आहे की, मी माझ्या प्रशिक्षकाची रणनीती यशस्वीपणे अमलात आणली. मी गेल्या एका वर्षापासून कठोर परिश्रम करत आहे. मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या कुटुंबाचे मी या निमित्ताने आभार मानतो.’
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ताप असूनही मानसने दोन्ही प्रकारांत आपली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवली. त्याच्या प्रगतीबद्दल मी समाधानी आहे. तरीही मला वाटते की, 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक थोडक्यात हुकले. मानसने यापूर्वी 2025 मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता, जिथे त्याने पेंटाथलॉनमध्ये पहिल्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले होते. तो अत्यंत शिस्तप्रिय आणि समर्पित मुलगा आहे असून त्याचे भविष्य उज्ज्वल आहे,’’ असे त्याचे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी सांगितले.
याप्रसंगी मीनल पालंदे (उपायुक्त – टीएमसी) आणि अशोक आहेर (योजना प्रमुख) यांनी मानस व त्याच्या पुटुंबाचे अभिनंदन केले आणि त्याला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

























































