इंदूरमध्ये 19 सप्टेंबरला ‘छात्रों की गूंज’, राहुल गांधी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘छात्रों की गूंज’ या विशेष अभियानाची घोषणा केली आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी हा संवाद कार्यक्रम पार पडणार असून, “तुमच्या समस्या, तुमच्या सूचना” हे या अभियानाचे मुख्य सूत्र असणार आहे.

या संवाद अभियानादरम्यान राहुल गांधी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी समोरासमोर चर्चा करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने वारंवार होणारी पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया, वाढती बेरोजगारी, भरमसाठ शैक्षणिक शुल्क, वसतिगृहांची दुरवस्था आणि विविध परीक्षा मंडळांचे ढिसाळ नियोजन यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेतले जाणार आहेत.

देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या या विशेष मोहिमेतील इंदूर हे पाचवे शहर ठरणार आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि पुणे येथे अशाच प्रकारचे संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्याला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.