
नांदेडच्या विकासाच्या नावाने कोट्यवधी रुपयांच्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात शहर-जिल्ह्यातील विकास कामांची अवस्था काय आहे? असा थेट सवाल उपस्थित करीत शिवसेनेने प्रशासनाविरोधात रणशिंग फुंकले आहे. ‘तुमसे ना हो पायेगा!’ या घोषणेसह ११ सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनआंदोलन होणार आहे.
घोषणा नकोत… काम हवं!
धाराशिवच्या विकासासाठी ‘जनआंदोलन’!
“मराठवाड्याचा विकास… तुमसे ना हो पायेगा!” pic.twitter.com/Whlj4ZySyo— Ambadas Danve (@iambadasdanve) September 10, 2026
दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी तीन वर्षापूर्वी केलेल्या घोषणेचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन सबंध मराठवाड्याचे लक्ष वेधणार आहे. या आंदोलनाला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीचे पाठबळ मिळणार असून शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार राहुल पाटील, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, भुजंग पाटील, ज्योतिबा खराटे, पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिकांसह सामान्य नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सरकारविरोधातील आक्रोशाचा आवाज घुमणार आहे.





























































