
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय संयोजकपदी अरविंद केजरीवाल यांची पुन्हा एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी 23 सदस्यीय नवी कार्यकारिणीदेखील स्थापन करण्यात आली असून पंकज गुप्ता हे राष्ट्रीय सचिव तर एन. डी. गुप्ता यांचीही राष्ट्रीय खजिनदारपदी फेरनिवड करण्यात आली.
अरविंद केजरीवाल हे 2012 मध्ये ‘आप’च्या स्थापनेपासून राष्ट्रीय संयोजक आहेत. नव्या कार्यकारिणीमध्ये आतिशी, आदिल अहमद खान, अनुराग धांडा, भगवंत मान, दिलीप पांडे, मनीष सिसोदिया, संजय सिंह, प्रिती मेनन, सत्येंद्र जैन, शेली ओबेरॉय, राखी बिर्ला आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.


























































