नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 1800 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढील वर्षी होणाऱया नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला 1 हजार 800 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. राज्य सरकारने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पावसाळी अधिवेशनात तीन हजार कोटी रुपये पुरवणी मागणीद्वारे मंजूर केले आहेत. प्राधिकरणाच्या विनंतीनुसार 1 हजार 800 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने आज मान्यता दिली. यापूर्वी सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षात प्राधिकरणाला 3 हजार 97 कोटींचा निधी दिला आहे.