
फिलीपाईन्समध्ये एका प्रवासी फेरीला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून तर 80हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी बेपत्ता आहेत. ‘एमव्ही जून ऍस्टर’ ही फेरी बोट मनिला येथून पालावान प्रांतातील कोरोन येथे जात होते. बोटीत 117 प्रवासी आणि 17 कर्मचारी मिळून 134 जण होते. सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास बोटीला अचानक आग लागली. बचाव पथकांना 43 जणांना वाचवण्यात यश आले असून इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे.




























































