मायावतींकडून पुन्हा पुतण्याची हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्या कुटुंबामध्ये पुन्हा राजकीय वाद उफाळून आला आहे. त्यांनी पुतण्या आकाश आनंद याची पुन्हा पक्षातून हकालपट्टी केली आहे. मायावती यांनी आज सकाळी ‘एक्स’वर पोस्ट करून माहिती दिली. आकाश याला सासऱयाचीच जास्त ओढ आहे. तो द्विधा मनःस्थितीत आहे. मी 3 सप्टेंबरला केलेली पोस्ट त्याने रिपोस्टदेखील केली नाही. त्याला पक्षात स्वतंत्र राहायचे असेल तो मुक्त आहे. आज त्याला पक्षाने मुक्त केले. त्याच्या सासऱयांनी राजीनामा देण्यास विलंब केला, असे मायावती यांनी या पोस्टमध्ये म्हटले.