ब्रिटनच्या संसदेत होणार संविधानाच्या अमृत महोत्सवाचा जागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवाचा जागर परदेशात प्रथमच ब्रिटनच्या संसदेत होणार आहे. देशविदेशातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बायोपिकसह विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात येणार आहे.

बीबीएमजी फाऊंडेशन लंडन यूके आणि मुंबई बोधिसत्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 27 एप्रिल 2027 आणि 1 व 2 मे 2027 रोजी ब्रिटनच्या संसदेत हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, त्यांची आंदोलने, त्यांचा वारसा आणि त्यांची दूरदृष्टी, ग्रंथसंपदा यांना समर्पित हा कार्यक्रम आहे. याअंतर्गत लंडन आणि लिसेस्टर येथे विशेष ‘थिएट्रिकल सादरीकरण’ (नाट्यमय सादरीकरण) सादर करण्यात येणार  आह. बोधिसत्व फाऊंडेनचे संस्थापक-अध्यक्ष अविनाश कांबळे व बीबीएमजी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव हंस यांनी याबाबत माहिती दिली.