
गॅस कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱयाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. महेंद्रसिंह राजपूत असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते निवृत्त बँक कर्मचारी आहेत. जुलै महिन्यात ते घरी होते. तेव्हा एकाने त्याच्या घराची बेल वाजवली. त्याने तो गॅस पंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. गॅसचे रींडिंग घेण्यासाठी आल्याच्या भूलथापा मारल्या. त्यानंतर तो किचनमध्ये शिरला. त्याने मीटरजवळचा पह्टो घेतला. घरात गॅस लीक आहे अशी भीती दाखवली. तसेच तपासणीसाठी माचीसचा बॉक्स मागितला. ठगाने भिंतीजवळ गॅस लीक आहे असे भासवण्यासाठी एक नट लूज केला. त्यानंतर आग पेटवून दाखवली. नट टाईट करण्याच्या त्याने बहाणा केला. त्याचदरम्यान ठगाने स्प्रे मारला. काही वेळाने तक्रारदार हे आले. त्याने आग पेटवून दाखवली. गॅस लीकेजची त्याने भीती दाखवली. गॅस लीक बंद करण्यासाठी मीटरचे वॉल बदली करावे लागतील असे सांगितले.
वॉल बदली करण्यास त्याने होकार दिल्यावर ठगाने काही वॉल काढले. त्या वॉलचे त्याने 14 हजार रुपये आकारले. त्याने ऑनलाइन पैसे घेण्यास नकार दिला. सुरुवातीला 12 हजार रुपये द्या उर्वरित रक्कम नंतर द्या असे सांगून तो निघून गेला. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी गॅस पंपनीत पह्न करून चौकशी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी महेंद्रसिंगला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.




























































