
आसाममध्ये ओएनजीसीच्या पाईपलाईनमधून कच्च्या तेलाची चोरी केल्याप्रकरणी गोलाघाट जिह्यातील सह-पोलीस अधीक्षक दीपेन पातर यांना अटक करण्यात आली आहे. गोलाघाटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्नील डेका यांनी सांगितले की, सरुपथर येथील श्याम गावात 3 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची चोरीची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात 29 ऑगस्ट रोजी काही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानी तोंड उघडल्यानंतर या चोरीत दीपेन पातर यांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले.




























































