चर्चगेट-विरार एसी लोकलमध्ये गळती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वे मार्गावर चालवण्यात येत असलेल्या एसी लोकल ट्रेनच्या देखभालीचा मुद्दा उपस्थित होत आहे. गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चर्चगेटहून विरारच्या दिशेने चाललेल्या एका एसी लोकलमधून अचानक पाण्याची गळती सुरू झाली. आधीच एसी ट्रेनमधील ‘पूलिंग’बाबत प्रवाशांकडून तक्रारी केल्या जात आहेत. त्यातच ट्रेनमध्ये गळती होऊन प्रवाशांच्या आसनापर्यंत पाणी साचू लागल्याने प्रवाशांनी गाड्यांच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक साध्या लोकल गाड्यांना गंज लागली आहे. प्रशासन हळूहळू एसी लोकल फेऱ्या वाढवत असल्याने साध्या लोकलकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अशातच महागड्या तिकिटाचा आर्थिक भुर्दंड सहन करून एसी लोकलचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाणी गळतीच्या नव्या डोकेदुखीला तोंड द्यावे लागत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.