
इंजिन निकामी झाल्याने अलायन्स एअरच्या विमानाचे शुक्रवारी दुपारी दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान सुरक्षित उतरल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
अलायन्स एअरचे ATR 72-600 हे विमान प्रयागराजहून दिल्लीला चालले होते. विमानात 40 प्रवासी आणि 4 कर्मचारी होते. दिल्लीकडे येत असताना विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनमधील तेलाचा दाब कमी झाल्यामुळे मुख्य वैमानिकाने प्राधान्याने लँडिंग करण्याची विनंती केली. यानंतर दिल्ली विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.





























































