गणेशोत्सवात वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवानिमित्त वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सेवेच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. सण-उत्सवाच्या कालावधीत प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 दरम्यान मुंबई मेट्रो वन पहाटे 1.03 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. वर्सोवा (VER) ते घाटकोपर (GHA) शेवटची मेट्रो 00.15 वाजता सुटेल. तसेच घाटकोपर (GHA) ते वर्सोवा शेवटची मेट्रो 00.40 वाजता सुटेल आणि 01.03 वाजता वर्सोवा येथे पोहोचेल.