आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपानंतर सायमा वाजेद यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या सायमा वाजेद यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक संचालक पदाचा राजीनामा दिला. संयुक्त राष्ट्रसंघाची आरोग्य संस्था आणि बांगलादेशी अधिकाऱ्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. सायमा वाजेद यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी प्रादेशिक संचालक पदाची सूत्रे स्वीकारली होती.