आयफोन 18 लॉन्च होताच जुने मॉडेल महागले; 17 चे बेस मॉडेल 17 हजारांनी महाग, आयफोन 16 मध्ये 20 हजारांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अ‍ॅपल कंपनीने आपली नवी सीरीज आयफोन 18 लाँच केली. ही सीरीज लाँच झाल्यानंतर जुने फोन स्वस्त होतील, अशी अपेक्षा आयफोन चाहत्यांना होती. परंतु, कंपनीने जोरदार धक्का दिला असून पहिल्यांदाच जुन्या आयफोनच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. मेमरी चिप महाग झाल्याने या किमती वाढवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

अ‍ॅपलने आपल्या सरप्राइज अँड शाइन इव्हेंटमध्ये आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स तसेच आपला पहिला फोल्डेबल फोन आयफोन ड्युओ लाँच केला आहे. या लाँचिंगनंतर तात्काळ कंपनीने जुन्या फोनच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. मेमरी चिप आणि कॉम्पोनेंट्सची कमतरता झाल्याने या फोनच्या किमतीत वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आयफोन 17 च्या 256 जीबी मॉडेलची किंमत आधी 82 हजार 900 होती. ती आता वाढून 99, 900 रुपये झाली आहे. म्हणजेच या फोनच्या किमतीत 17 हजारांची वाढ झाली आहे.

512 जीबी व्हेरियंटची किंमत 1 लाख 2 हजार 900 रुपये होती. ती आता वाढून 1 लाख 24 हजार 900 रुपये झाली आहे. या फोनच्या किमतीत 22 हजारांची वाढ झाली आहे. कंपनीने आयफोन 17 ई आणि आयफोन 16 च्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. आयफोन 17 ईच्या 256 जीबी स्टोरेजचा फोन 64,900 होता. त्याची आता 79,900 रुपये किंमत झाली आहे. 512 जीबी व्हेरियंटची किंमत 84,900 होती. ती आता 1 लाख 4 हजार 900 रुयपे झाली आहे. तर आयफोन 16 च्या 128 जीबी फोनची किंमत 69,900 रुपये होती. ती आता 89,900 रुपये झाली आहे.