भुयारी मेट्रोची डिजिटल तिकीट विक्री अडीच कोटींपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरे-कफ परेड भुयारी मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी डिजिटल तिकिटांना वाढती पसंती दिली आहे. या मार्गिकेवर आतापर्यंत अडीच कोटींहून अधिक डिजिटल तिकिटांची विक्री झाल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे. प्रवाशांनी विविध पर्यायांचा वापर करून मेट्रोचे डिजिटल तिकीट खरेदी केले. तिकीट रांगेत उभे राहण्याचे टाळून प्रवाशांनी 8 सप्टेंबरपर्यंत 2 कोटी 51 लाख 45 हजार 566 डिजिटल तिकिटांची खरेदी केल्याची आकडेवारी समोर आली आहे. भुयारी मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तिकीट खरेदीचे मेट्रो कनेक्ट 2 अ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप तिकीट, मुंबई वन आणि एनसीएमसी कार्ड असे विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मेट्रो वन’ कार्डद्वारे 51 लाख 67 हजार 040 डिजिटल तिकिटांची विक्री झाली, तर ‘ओएनडीसी’द्वारे 44 लाख 13 हजार 208 तिकिटे, ‘मुंबई वन’ कार्डद्वारे 24 लाख 47 हजार 614 तिकिटांची विक्री झाली.