
आंतरराष्ट्रीय उड्डाणानंतर विहित दोन तासांच्या कालावधीत अनिवार्य ब्रेथलायझर चाचणी न केल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसने चार वैमानिकांसह आठ कर्मचारी सदस्यांना निलंबित केले आहे. फुकेत-दिल्ली उड्डाणानंतर एअर इंडियाच्या विमानातील टर्ब्युलन्सनंतर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्ही कंपन्यांच्या वैमानिकांसाठी डोप टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान 2 ऑगस्ट रोजी दुबईहून अमृतसर पोहचले. अमृतसरमधील श्री गुरू राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर दोन तासांच्या आत डिक्लेरेशन करणे आवश्यक होते. मात्र, त्यांना 35 मिनिटांचा विलंब झाला आणि त्यांनी 2 तास 35 मिनिटांनंतर डिक्लेरेशन केले. यामुळे विमान कंपनीने या नियमांच्या उल्लंघनाची माहिती विमान वाहतूक सुरक्षा संस्था असलेल्या डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनला (DGCA) दिली आणि त्या आठही सदस्यांना निलंबित केले.


























































