
गौरीगणपती विसर्जनासाठी रत्नागिरी नगर परिषदेने पूर्वतयारी केली आहे.पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ६फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन कुत्रिम तलावात करावे असे आवाहन रत्नागिरी नगरपरिषदेने केले आहे.रत्नागिरी नगरपरिषदेने जयस्तंभ येथील बगीच्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी कुत्रिम तलाव तयार केला आहे.
रत्नागिरी शहरात मांडवी समुद्रकिनारी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते.याठिकाणी रत्नागिरी नगरपरिषदेने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.


























































