
तिरुपती लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱया तुपातील भेसळीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सुकृती फूड्सचे प्रवर्तक कैलाश चंद मंगला यांना ईडीने अटक केली. 2019 ते 2024 दरम्यान टीटीडीला जवळपास 230 कोटींचे तूप पुरवण्यात आले होते. यापैकी 96 कोटींचे भेसळयुक्त तूप मंगला यांनी तयार केले होते.































































