मेरठमध्ये हवाई कसरतींची आतषबाजी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील मेरठच्या मोहिउद्दीनपूरमध्ये हिंदुस्थानी हवाई दलाच्या सूर्यकिरण एअरोबेटिक टीमकडून एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चालणाऱया या एअर शोमध्ये पहिल्या दिवशी शनिवारी सूर्यकिरण टीमच्या फायटर जेट विमानांनी आसमंतात वेगवेगळ्या कसरती करून दाखवल्या. या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांचे जणू काही डोळ्यांचे पारणे फिटले, असे येथील दृश्य होते. मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या तरुणाईने सर्व कसरती आपल्या कॅमेऱयात कैद केल्या. या एअर शोमध्ये 9 हॉक एमके-32 विमानाने केवळ 200 फूट उंचीवरून दाखवलेल्या कसरती खरोखरच पाहण्यासारख्या होत्या. उद्या रविवारी या एअर शोचा अखेरचा दिवस आहे.