Asian Games 2026 – नागोया नगारा…वडील-मुलाने पेटवली क्रीडा ज्योत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानच्या क्रीडा इतिहासातील दोन पिढय़ांना जोडणारा भावनिक क्षण उद्घाटन सोहळय़ात पाहायला मिळाला. माजी आशियाई क्रीडा सुवर्णपदकविजेते शिगेनोबू मुरोफुशी आणि त्यांचे पुत्र कोजी मुरोफुशी यांनी संयुक्तपणे आशियाई क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. कोजी मुरोफुशी हे 2004 अथेन्स ऑलिम्पिकचे हातोडाफेक सुवर्णपदकविजेते आहेत, तर त्यांचे वडील शिगेनोबू यांनीही आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत.

उद्घाटन दिमाखदार, पण पडद्यामागे गोंधळ

उद्घाटन सोहळा दिमाखदार झाला असला तरी त्याआधी स्पर्धेच्या आयोजनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. खेळाडू आणि अधिकाऱयांनी निवास, वाहतूक, नोंदणी आणि इतर व्यवस्थांबाबत अडचणी नोंदवल्या. पारंपरिक ‘गेम्स व्हिलेज’ उभारण्याऐवजी हॉटेल्स, तात्पुरत्या लाकडी निवास व्यवस्था आणि बंदरात उभ्या असलेल्या क्रूझ जहाजाचा वापर करण्यात आला. काही पथकांनी निवास व्यवस्थेतील अडचणींबाबत तक्रारी केल्या.

हार्ट बीटमधून एकतेचा संदेश

हार्ट बीट संकल्पनेनुसार हृदयाच्या ठोक्याला आशियातील खेळाडू, प्रेक्षक आणि विविध संस्कृतींना जोडणारे प्रतीक मानण्यात आले. उद्घाटन सोहळय़ात ही संकल्पना केवळ नावापुरती न राहता नृत्य, संगीत, प्रकाशयोजना आणि दृश्य सादरीकरणातून प्रभावीपणे मांडण्यात आली.