
की-बोर्डवर चहा पडल्यास सर्वात आधी की-बोर्डचा वीजप्रवाह खंडित करणे हा सर्वात महत्त्वाचा आणि सुरक्षित उपाय आहे, जेणेकरून शॉर्ट सर्किट होणार नाही.
वायरलेस की-बोर्ड असेल तर सेल/
बॅटरी त्वरित काढा. वायर्ड की-बोर्ड असेल तर USB वायर बाहेर काढा. लॅपटॉप असेल तर तो त्वरित बंद करून चार्जर काढून टाका.
की-बोर्ड ताबडतोब उलटा करा ज्यामुळे चहा की-बोर्डच्या आत खोलवर जाण्याऐवजी बाहेर पडेल. की-बोर्ड उलटा धरून हलकेच हलवा, जेणेकरून जास्तीचा चहा बाहेर निघून जाईल.
की-बोर्ड उलटा धरून वरचा भाग एका सुक्या कपडय़ाने की-बोर्डच्या वरचा आणि बटणांमधील चहा पुसून घ्या. तो 24 ते 48 तास उलटा करून पंख्याखाली सुकत ठेवा.
की-बोर्ड वाळवण्यासाठी हेअर ड्रायर वापरू नका. त्याच्या गरम हवेमुळे की-बोर्डची प्लॅस्टिक बटणे /आतले सर्किट वितळू शकते. की-बोर्ड चालू करण्याची घाई करू नका.
































































