हे करून पहा  – बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा वाटली डाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाटली डाळ करण्यासाठी 2 वाट्या हरभरा डाळ सकाळपासून भिजत ठेवा.

मिरची, मीठ आणि साखरेसोबत पाट्या किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटा. त्यात 1-1.5 चमचा लिंबाचा रस घाला.

बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात मिसळा. त्याने चव आणखी वाढेल.

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालून खमंग पह्डणी द्या. सर्व साहित्य एकजीव करून आस्वाद घ्या.