अमेरिकेत आता ‘एआय फोर्स’ स्थापन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्टिफिशनल इंटेलिजन्स (एआय) फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे. नवीन एआय सल्लागार नियुक्त करण्याच्या योजनेबद्दल ट्रम्प यांनी माहिती दिली. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर ही माहिती दिली. मात्र त्यांनी दोन्ही योजनांची रूपरेषा आणि त्या अंमलात आणण्याची पद्धत सांगितली नाही.

अमेरिका आणि चीन एआय क्षेत्रात आघाडी मिळवण्याच्या शर्यतीत असताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली. ट्रम्प यांची गुरुवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांचे प्रशासन एआयला प्रोत्साहन देईल. तसेच संभाव्य गैरप्रकारांना सामोरे जाण्यासाठी विद्यमान फौजदारी आणि दिवाणी न्यायव्यवस्थेचा वापर केला जाईल.

ट्रम्प यांनी एआय आणि डेटा सेंटरच्या टीकाकारांवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, उदारमतवादी लोकांना हा उद्योग ‘संपवायचा’ आहे. ट्रम्प यांनी लिहिले, ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून मी असे होऊ देणार नाही.’