
उत्तर मुंबई परिमंडळ-3 अंतर्गत असलेल्या दहिसर, कुरार व वनराई पोलिसांनी सुरू केलेल्या शोधमोहिमेत तीन शस्त्र्ाधारी तरुणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना व उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजीत पाटील ऑस्कर कोलासो, राजू नार्वेकर, बसवराज चुंगी वडय़ार, विलास आव्हाड, नीलेश शनवार, वनराईचे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शिंदे, योगेश साळुंखे, संतोष तेली, नीलेश शिंदे व कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रफिक मुजावर, शकील शेख, कांबळे, तुषार बारसिंग या पोलीस पथकाने दहिसर, कुरार व वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू केलेल्या शोधमोहिमेत वाजीद अली इसरार मलिक (26, राहणार तारी पंपाऊंड, दहिसर), संदीप रमाकांत उपाध्याय (34, राहणार कुरार व्हिलेज), रोहित अविनाश सावंत (26, मालपा डोंगरी चकाला/अंधेरी पूर्व) हे शस्त्र्ाधारी तरुण आढळून आले. त्यांच्याकडून तीन अग्निशस्त्र्ा व 11 जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली असून अधिक तपास सुरू आहे.

























































