
लंडनहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या ड्रीमलाईनर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी पहाटे विमानाचे हिथ्रो विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात नेमका काय बिघाड झाला, किती प्रवासी होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे 6E4 ही सेवा देणारे बोईंग 787-9 या विमानाने हिंदुस्थानी वेळेनुसार बुधवारी पहाटे 12.40 वाजता लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून उड्डाण केले. यानंतर तासभराने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान पुन्हा हिथ्रो विमानतळावर माघारी वळवण्यात आले. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास विमान हिथ्रो विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले. इंडिगोकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही.

























































