
जम्मू-काश्मीरमधील रामबन जिह्यात एका कारमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हेड कॉन्स्टेबल फरीद अहमद आणि सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल मोहम्मद याकूब असे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोघेही रामबनच्या जिल्हा पोलीस लाइन्समध्ये तैनात होते. दोघेही कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळले.



























































