
घरात, विशेषतः स्वयंपाकघरातून झुरळे दूर ठेवण्यासाठी बेकिंग सोडा आणि पिठीसाखरेचे मिश्रण कोपऱयात ठेवणे हा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय आहे.
समप्रमाणात बेकिंग सोडा आणि पिठीसाखर एकत्र करून किचनच्या कोपऱयात किंवा सिंकखाली ठेवा. साखरेच्या गोड वासाने झुरळे आकर्षित होतात आणि बेकिंग सोडय़ामुळे त्यांचा नाश होतो.
पाण्यात पांढरे व्हिनेगर मिसळून स्प्रे तयार करा. जिथे झुरळे जास्त येतात त्या जागांवर किंवा पाइपजवळ रात्री झोपण्यापूर्वी हा स्प्रे मारा.
फरशी पुसण्याच्या पाण्यात कडूलिंबाचे तेल किंवा पाल्याची पावडर वापरा. याच्या उग्र दर्पामुळे झुरळे पळून जातात.






























































