
बिहारमधील जमुई येथे दहावीत शिकणाऱ्या एका तरुणीसोबत छेडछाड झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता समस्तीपूरमध्येही असाच प्रकार घडला आहे. समस्तीपूर येथे भर रस्त्यात एका तरुणीसोबत गैरवर्तन झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्पूरीग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगतसिंगपूर गाव येथील बांध बायपास रोडवर फोटो काढण्यासाठी थांबलेल्या एका तरुणीला काही तरुणांनी घेरले. तरुणीला शिवीगाळ करत तिच्याशी अश्लील गैरवर्तन करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ समोर आल्यानंतर समस्तीपूर पोलीस तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत जगतसिंगपूर येथील चार तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेत सहभागी असलेल्या इतर लोकांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे तपासकार्य सुरू आहे.
जमुई जिले के बाद अब समस्तीपुर जिले में बीच सड़क पर हैवानियत का नंगा नाच देखने को मिला है।
यहां भी कुछ हवसी एक लड़की पर टूट पड़े और उसके साथ जमकर बदसलूकी की है।
पूरा मामला कर्पूरीग्राम थाना क्षेत्र के जगतसिंहपुर गांव स्थित बांध बाईपास रोड की है जहाँ बेखौफ मनचलों ने जमुई जैसी… pic.twitter.com/PdpDhaRNnQ
— Sadan Singh Rajput (@SadanJee) September 24, 2026
नेमके काय घडले?
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका तरुणासोबत बांध बायपास रस्त्याने जात होती. दोघेही रस्त्याच्या कडेला थांबून फोटो काढत होते. त्याच वेळी तीन ते चार तरुण तिथे पोहोचले आणि त्यांनी तरुणीला घेराव घातला. त्यानंतर त्यांनी तरुणीसोबत असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरुण तरुणीला तिचे नाव आणि पत्ता विचारताना तसेच शिवीगाळ करताना दिसत आहेत. व्हिडिओत तरुण तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना आणि रस्त्यावर ओढतानाही दिसत आहेत.


























































