
हिंदुस्थानच्या स्क्वॉशपटूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लय कायम ठेवत अभय सिंह आणि अनाहत सिंह यांनी रौप्यपदकांची कमाई केली. पुरुष आणि महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारत हिंदुस्थानच्या पदकतालिकेत दोन रुपेरी पदकांची भर घातली. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अभय सिंहला मलेशियाच्या एंग ऐन योऊकडून पराभव पत्करावा लागला, तर महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अनाहत सिंहला मलेशियाच्या सिवासंगारी सुब्रमण्यमने 3-0 असे पराभूत केले.






















































